सिंधुदुर्ग उबाठा शिवसेनेत अंतर्गत मतभेद !......जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांची नाराजी

सिंधुदुर्ग उबाठा शिवसेनेत अंतर्गत मतभेद !......जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी व विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांची नाराजी

 

वेंगुर्ले

 

       वेंगुर्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली याआधी स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत वरिष्ठ पदाधिकारी म्हणून काही पदाधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करत असतील तर ते आम्हाला मान्य नाही. अशी नाराजी वेंगुर्ले येथील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. दाभोली येथील जमीन व्यवहार प्रकरणात स्थानिक महिलांना मारहाण झाली होती. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक आणि परशुराम उपरकर यांनी आंदोलन केले होते या आंदोलनात वेंगुर्ला तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना सांगण्यात आले नव्हते असे वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी सांगितले. वेंगुर्ला येथील प्रकरणात स्थानिक शिवसैनिकांना विश्वासात न घेता नाईक आणि उपरकर करत असलेले आंदोलन आम्हाला मान्य नाही. सर्वांना विश्वासात घेऊन अशा गोष्टी कराव्यात संघटनेला बाधा होईल अशा गोष्टी होऊ नयेत. असे सांगून वेंगुर्ला तालुकाप्रमुखसह गावातील सरपंचांनी आणि कार्यकर्त्यांनी आपली नाराजी यावेळी व्यक्त केली.शिवसेना संघटन म्हणून हे प्रकार आम्हाला मान्य नाहीत अशा पद्धतीचा मनमानी कारभार कोणाचाही मतदारसंघात खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशाराच जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आणि विधानसभा मतदार संघप्रमुख रुपेश राऊळ यांनी यावेळी दिला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फूट पडली आहे का? असा प्रश्न उपस्थिती होत आहे.
      यावेळी वेंगुर्ले येथे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, मतदार संघ प्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, माजी नगरसेवक तुषार सापळे, दाभोली सरपंच उदय गोवेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, महिला पदाधिकारी  उपस्थित होते.