वेत्ये येथे १२ फूटी महाकाय मगर जेरबंद.....वनविभागाच्या जलद कृती दलाची थरारक मोहिम; ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा निःश्वास

वेत्ये येथे १२ फूटी महाकाय मगर जेरबंद.....वनविभागाच्या जलद कृती दलाची थरारक मोहिम; ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा निःश्वास

वेत्ये

 

        वेत्ये कलेश्वर मंदिरालगत ओहोळात गेल्या काही दिवसांपासून वास्तव्य करून असलेल्या सुमारे १२ फूटी महाकाय मगरीला आज अखेर वनविभागाच्या जलद कृती दलाच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असून ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
        गेल्या काही दिवसांपासून परिसरात ही विशाल मगर फिरताना दिसून येत होती. त्यामुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी वनविभागाकडे या मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
       रविवारी सायंकाळी सुमारास साडेचार वाजता जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांच्यासह जवान शुभम कळसुलकर, आनंद राणे, प्रथमेश गावडे यांनी घटनास्थळी दाखल होऊन मोठ्या कौशल्याने मोहिम पार पाडली.
        यावेळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, जितेंद्र गांवकर, बाळू गांवकर, बाळू गावडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.